Tuesday 24 February 2015

Splendid Shades of Nature



मला  निसर्ग खूप आवडतो .


Photography  चा  छंद हा मला ट्रेकला जायला लागल्या पासून जडला.


Trekking ला गेलं की निसर्गाची  विवीध  रूपे  अजून  जवळून  अनुभवता येतात .


 मग ती  कॅमेऱ्यात टिपून  ठेवली  की  कधीही  बघता येतात  आणि आठवणी  बनून मनाच्या  अल्बम मध्ये  साठवता  येतात.


असेच  फिरता  फिरता काही घेतलेले photographs मनाला  खूप  भावले .


त्यातलेच काही photographs blog वर टाकते आहे  …… :)



Sunset at Belpada village near Harishchndragad :


हरिश्चंद्र गड  उतरताना  सुर्यास्ताचा वेळी  घेतलेला  हा click  त्या झाडाच्या background मुळे 

अजून देखणा दिसतो आहे.


    


Few clicks taken at  M.I.T  College near ARAI  Hill  :


प्रखर  अशा  उन्हाळ्यात   मे  महिन्यामध्ये   संध्याकाळी   सुर्य  मावळतीचा  दिशेने  निघाला  होता .
त्या  आकाशात  पसरलेल्या  गर्द लाली  मध्ये  सुद्धा  तो  तेजस्वी  आणि उठून  दिसत  होता .





सूर्य   त्या  निष्पर्ण  झाडामागून  तळपत होता आणि परत  मी  उगवणार असा सांगून  सगळ्यांचा  निरोप घेत  होता.





Red color of horizon:


तारकर्ली  beach वर  संध्याकाळी  क्षितिजावर पसरलेली  लाली,  आणि  त्या  फोटोला  

border  म्हणुन शोभणारी  नारळाची  झाडे छान दिसत होती .




                                    

               सुर्यास्तावर  ऎक कविता सुचली ती share  करते आहे  


तो तर उगवणार आहे परत उद्या आपल्यासाठी
रुसून बसलेल्या कळ्यांना अलगद उमलवण्यासाठी 

 घरट्यात विसावणाऱ्या पक्षांचा किलबिलाट ऐकण्यासाठी
निळ्या नदीच्या पाण्यात आपले प्रतिबिंब बघण्यासाठी 

 वृक्षांना नवीन संजीवनी देण्यासाठी 
त्या विस्तीर्ण आकाशात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी

   क्षितिजावर जावून जमिनीला आणि आकाशाला परत भेटवण्यासाठी 
              अवखळ मनात आशा आकांक्षा आणि जगण्याची नवी उम्मेद जागवण्यासाठी


       K2

3 comments:

  1. Good going Ketu! :-) Mast ahet photos.. Kavitetl aaaplyala kay evdha kalat nay :D

    ReplyDelete
  2. Super.... K2
    Keep it up .. :)

    ReplyDelete