Sunday 22 March 2015

Himalayan Odyssey...

Himalayas...

ट्रेक्कींग आवडायला लागल्या पासून एकदा तरी हिमालयात  ट्रेक करायचा असं मनापासून वाटत होत.


office मधून सुट्टी मिळाली आणि प्लान पक्का झाला …….

मग  काय  युवाशक्ती  नावाच्या  group  तर्फ्रे “ हर  की  दून”  नावाचा  ट्रेक करण्याचे  ठरवले.

"हर  की  दून” ही  cradle shape Hanging  valley  "Garhwal Himalayasमध्ये  आहे.

"हर की दून" म्हणजे  "Gods Valley"  इथूनच पांडव स्वर्गात  गेले असे ऐकिवत आहे. 
ही  valley  snow-covered peaks आणि वेगवेगळ्या coniferous वृक्षांनी नटलेली  आहे.
इथले जंगल हे wildlife ने समृद्ध आहे .पक्षी निरीक्षणासाठी आणि nature lovers साठी 
जणू काही पर्वणीच आहे.
पण sunset आणि पक्षी दिसायला मात्र खरच luck लागतं.कारण बऱ्याच वेळा ढग
आणि धुक्यामुळे समोरचं सुद्धा दिसेनासं होतं..

"हर  की  दून" ला जाताना पुणे -दिल्ली -देहरादून आणि देहरादून पासून सांक्री असा बेस 
कॅम्प-1 पर्यंत चा प्रवास करावा लागतो.

पुणे -दिल्ली -देहरादून हा प्रवास आम्ही  train ने  केला. खूप दिवसांनी  लांबच्या  प्रवासाला 
निघाल्याने  मस्त  वाटत  होते .
Train  मध्ये  ट्रेक चा  सगळा  group  एकत्र  भेटला  आणि  मग  3 दिवस  प्रवासात  कसे  गेले ते  
कळलेच  नाही .
कधी  पत्ते  तर  कधी  अंताक्षरी ,jokes ,dumb sheraz असा  time pass करत आम्ही  
देहरादूनला पोहोचलो . 
इतका  मस्त  time pass झाल्यामुळे  प्रवासाचा  फारसा थकवा जाणवत न्हवता.
या  प्रवासामुळे  सगळे  जण एकमेकांचे  चांगले  friends बनले  होते.


देहरादून  पासून "हर  की  दून" ला जाताना first base camp  सांक्री आहे. सांक्रीला पोहचण्यासाठी 
अरुंद वळणे असलेले रस्ते आणि घाटातून प्रवास करावा लागतो. 
पण तिथे local drivers गाडी चालवण्यात expert असल्याने फारशी काळजी वाटली नाही.
ऎका बाजूला खळखळत वाहणारी नदी, हिरव्यागार सफरचंदानी लगडलेली झाडे
सुंदर डोंगररांगा बघत आम्ही finally सांक्रीला पोहोचलो.

सांक्री मधून समोर दिसत असलेल्या डोंगर रांगांचा घेतलेला photo :





दुसऱ्या दिवशी breakfast आणि घोषणा झाल्यवर आम्ही second base camp
म्हणजे तालुका नावाचा गावाला जाण्यासाठी निघालो .

तालुकाला जायला प्लेन 10 km चा रस्ता आहे .
संपूर्ण रस्त्यात आजूबाजूला अक्रोड देवदार पाईन असे वेगवेगळे वृक्ष बघायला मिळत होते.
जंगल दाट असल्याने कधी कधी तर सुर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पोहचत न्हवता.
हवामानाचे  थंड आणि दमट असे combination असले तरी एकूणच वातावरण हे उस्ताह वाढवणारे होते. 
Pine cone गोळा करत त्या रस्त्यातून चालताना मजा वाटत होती.


खूप दिवसांनी भरपूर चालल्याने पाय चांगलेच मोकळे झाले होते .... 
आणि पुढच्या ट्रेकसाठी warm up exercise पण झाला होता.

तालुकाला पोहचल्यावर valley चा घेतलेला super click awesome वाटत होता.






तालुका पासून ओसला ह्या बसे कॅम्प २ ला जाण्यासाठी १७ km चा ट्रेक आहे.
इथे रस्त्यात दुर्योधनाचे मंदिर प्रथमच पाहायला मिळाले ....

तालुका पासून सुपीन नावाची  नदी  आमच्या सोबत  डोंगर  दऱ्यातून  मार्ग  काढत  चालत  होती .
तिचे  पाणी  स्फटिकासारखे  स्वच्छ  आणि निर्मल  होते ,त्या नदीचा घेतलेला हा  फोटो:


सुपीन नदी  :




तिथे पावसाचा भरोसा नसतो साधारण दुपार नंतर कधीही पाउस सुरु होवू शकतो 
म्हणून दुपारच्या आत पुढचा base camp गाठायचा असा साधारण 
कार्यक्रम ठरलेला असायचा.

Trek  करत असताना  2 - 3 छोटे  लाकडी  bridge cross करावे  लागतात  ..

असाच  ऎक  bridge cross करतांना  घेतलेला click...........





bridge चा समोरून घेतलेला हा click...........





सांक्री पासून तालुका ला जात असताना हळूहळू आम्हला snow-covered पर्वत रांगांचे 
दर्शन होवू लागले आणि आमचा आनंद द्विगुणीत झाला.

Trek च्या मार्गावर छोटी छोटी ५ -१० घरे असलेली गावे लागली. ही गावे  
आपल्या नेहमीच्या खेड्यांपेक्षा अगदीच एकाकी आणि वेगळी होती.
तिथली घरं सुद्धा लाकूड आणि दगडांनी बांधलेली आणि उतरत्या छपरांची होती.
थंडी पाउस आणि बर्फापासून बचाव करण्यासाठी अशी रचना केली असावी  
असा अंदाज बांधता येईल.

गावामधील घरांचा घेतलेला photo:








लोकांची राहणी जुन्या पद्धतीची होती आणि dress सुद्धा अगदी पारंपारिक वाटत होते .
संध्याकाळी लाल गुलाबी गाल असलेल्या बायका पाठीवरच्या bag मध्ये
बरेच ओझे वाहून घरी परतताना दिसल्या. 
उस्तुकता म्हणून bag मध्ये पाहिल्यावर pine cone आणि pine needles असे इंधनासाठी 
लागणारे समान दिसले.

गोरे गोरे आणि गुलाबी गोबरे गाल असलेली मुले toffee(chocolate) मागत आमच्या 
मागे फिरत होती.
त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव आणि साधी toffee मिळल्यानंतरचा आनंद 
न विसरण्यासारखा होता.

ट्रेक मध्ये स्वर्गरोहीणी आणि कालानाग अश्या दोन पर्वत रांगा बघयला मिळतात.
उन पावसाचा खेळ हा हिमालयीन पर्वत रांगांमध्ये कायमच रंगलेला असतो.


ढगांच्या  मागून  डोकावणारा  हा  स्वर्गरोहीणी पर्वत :





पांडव याच  पर्वतावरून  स्वर्गात गेले असे वर्णन  आहे .

आजूबाजूचा विलोभनीय निसर्ग डोळ्यात साठवत आम्ही पाऊले पुढे टाकत चालत होतो.

तिसऱ्या दिवशी  आम्ही ओसला पासून  "हर की दून " ला जायला  निघालो हा ट्रेक १४ km चा आहे.
हा रस्ता आपल्याला डोंगरावरची शेती ,हिरवीगार कुरणे आणि अनेक जंगली फुलांनी
बहरलेल्या पाय वाटेतून घेऊन जातो.
इथे प्रथमच सूर्याचे दर्शन झाले.अचानक एखादा waterfall पण दर्शन देऊन जात होता.


ओसला पासून कधी उन  कधी पाऊस कधी धुके अश्या वातावरणातून  चालत असताना लांब वाटणारी 
शिखरे अजूनच जवळ दिसू लागली,
आणि मग कॅमरा काढून ती  टिपण्याची  इच्छा पूर्ण झाली .


स्वर्गरोहीणी  पर्वताचा जवळून  दिसणारा  view:




"हर  की  दून" ला पोहोचल्यावर सगळ्यांचा चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

आम्ही जवळपास १००० फुटांवर पोहचलो होतो.
वातावरणात थंडीत बरीच वाढ झाली होती.
रात्री tent  मध्ये slipping bag मध्ये सुद्धा चांगलीच थंडी जाणवत होती.

तिथे १ रात्र मुक्काम करून आम्हला सकाळी Jaundhar glacier
चालत जायचे होते.
"हर की दून" पासून glacier असा आमचा चवथ्या दिवशीचा प्रवास चालू झाला.

रस्त्यात ढगांमुळे  अचानक  समोरचे  दिसेनासे  होत  होते  आणि अचानक  सगळा
 रस्ता  clear दिसायला लागत  होता .
आजूबाजूला   सगळी  valley ही जांभळ्या ,पांढऱ्या फुलांचा ताटव्यांनी  नटलेली  दिसत  होती .
थंडी  बरीच  जाणवत  होती  आणि  धुके  आणि  ढग  असले  तरीही  वातावरण  अत्यंत विलोभनीय
 होते .

  Jaundhar Glacier कडे  जाताना  घेतलेला  हा  फोटो:





या रस्त्यात नदीवरून जाणारा पुलावर पाण्यात पाय सोडून तासान तास बसून राहावे  आणि 
आजूबाजूची दृश्य शक्य तेवढी डोळ्यात साठवून ठेवावी असे वाटत होते.  
एखाद्या hindi romatic गाण्याचे शूटिंग व्हायला इथे चांगला वाव आहे असा विचार 
मनात येउन गेला....

निसर्गाचे इतके सुंदर  रूप मी प्रथमच पाहत होते .


Glacier कडे जाताना धुक्यात  हरवलेली वाट:




glacier वर बर्फात खेळण्याची इच्छा पण पूर्ण झाली.

"हर की दून" ला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या ट्रेकला निघालो....
परत त्याच  route ने ट्रेक करत खाली जायचे होते. पण तरीही खाली  उतरतांना निसर्ग काही वेगळाच भासत होता .

निसर्गाची अनेक पैलू दाखवणारा आणि बर्फाछाद्दीत हिमशिखरांची झलक घडवणारा हा ट्रेक कायम स्मरणात राहील .


K2
[Ketaki Ratnaparakhi]



1 comment:

  1. WOW!! Amazing pictures and crisp writing.. :-) Loved it K2!

    ReplyDelete